भांगसी माता गड
भांगसी माता गड
•औरंगाबाद मध्ये एक रम्य वातावरण असलेला हा गड.
आपण बोलत आहे औरंगाबाद मध्ये एका शरणापुर गावाच्या बाजूला असलेला गड ज्याचे नाव आहे भांगसी माता गड एक असा गड आहे ज्याच्यावर गेल्यावर असं वाटतं की आपण एखाद्या रम्य वातावरणात आहे. औरंगाबाद City पासून 15 km दूर कोरडी व शरणपूर गावांच्या बाजूला आहे हा गड.
भांगसी माता गड मध्ये अंबाबाई नावाची देवी आहे सकाळी व रात्री अंबाबाई देवीची पूजा होते ही देवी खूप पूर्वी पासून गडावर स्थित आहे. या देवीच्या दर्शनासाठी लोक खूप दूर दुरून येतात. आणि भांगसी बघण्यासाठी टुरिस्ट पण खूप सारे येतात. भांगसी माता गड वर कमी ते कमी 450 ते 500 पहिरया आहे. या गडाच्या वर गेल्यावर खालचा निसर्ग खूप सुंदर व रम्य दिसतो. पावसाळ्यात या गडावर गेल्यावर सर्व वातावरण खूप हिरवगार होतं. भांगसी माता गडावर गेल्यावर मोबाईल नेटवर्क चालल्या जातं. गडाच्या वर खूप जोर जोरात हवा चालू असते.
भांगसी माता गडा मध्ये खूप धन लपवलेलं आहे असं पूर्वीचे लोक म्हणतात. या गडाच्या बाजूला गायी माताची रक्षणासाठी गोशाळा आहे. गोशाळा मध्ये गाय माताची खूप काळजी घेतात. भांगसी माता गडाची खाशीत आहे की या गडावर जाण्यासाठी फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे त्याशिवाय गडावर जात येत नाही.
भांगसी माता गड हे फक्त पहिले एक साधारण गड होते पण वेळानुसार सगळं बदलत गेलं आणि या गडाला एक महाराज तेच म्हणजे परमानंद गिरी महाराज यांनी अंबाबाई देवी मंदिराची स्थापना केली आणि या देवीची रोज सकाळी व संध्याकाळी पूजा चालू केली. परमानंद गिरी महाराज एकूण बारा वर्ष तप केलेले महाराज आहे. परमानंद गिरी महाराज हे खूप मोठे महाराज आहे. परमानंद गिरी महाराजांनी एका विद्यालयाची स्थापना केली आहे आणि या विद्यालयाचे नाव त्यांचे नावाने आहे तेच म्हणजे परमानंद गिरी महाराज विद्यालय. परमानंद गिरी महाराज विद्यालय मध्ये खूप चांगले संस्कार दिले जातात विद्यार्थ्यांना..
भांगसी माता गडाच्या खाली मंदिर आहे हे मंदिर राजस्थान वरून एक्स्पोर्ट झालेल्या दगडांची बनवलेले आहे हे मंदिर भांगसी माता गडाच्या पायथ्याशी आहे या गडावर खूप छान प्रकारे बनवलेल्या गुफा पण आहेत. ह्या गुफा जुन्या लोकांनी बनवलेल्या आहे म्हणजेच पूर्वीच्या लोकांनी तयार केलेल्या गुफा आहेत या गडावर खूप झाडे लावलेले आहे त्याचमुळे गडावर खूप छान व सुंदर हवा चालू असते. भांगसी माता वर फक्त जाण्यासाठी एकच मार्ग आहे तोच म्हणजे समोरून.
Comments
Post a Comment